नमस्कार मंडळी,
आपल्या सर्वांचे दातार कुलमंडळातर्फे सहर्ष स्वागत.
दातार कुलवृत्तान्त 1974 साली प्रकाशित झाला होता. आज या घटनेस पन्नास वर्षे होत आहेत. गेल्या पन्नास वर्षात दातारकुलामध्ये झालेली प्रगती, त्याचा झालेला विस्तार याची नोंद करण्यासाठी कुलवृत्तांताची द्वितीय आवृत्ती सिद्ध करणे आवश्यक आहे. या दृष्टीने कुलमंडळ प्रयत्न करीत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रस्तुत संगणकीय माहिती संकलन सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम सुरू आहे.
आजचे युग हे आंतरजालाचे आहे. कुलवृत्तान्त तयार करणे आणि त्यासाठी माहिती संकलन करणे यासाठी आपण संगणकाचा प्रभावीपणे वापर करू शकतो. त्यामुळे माहिती संकलनासाठी लागणारा वेळ वाचेल, तसेच उपलब्ध माहितीची छाननी करणे, त्याची क्रमवारी लावून योग्य प्रकारे प्रस्तुत करणे हे शक्य होणार आहे. प्रस्तुत सॉफ्टवेअरमुळे कुलबंधूंची माहिती संकलित करणे तसेच त्या माहितीच्या आधारे वंश वृक्ष तयार करणे, आणि वापरकर्त्याला दातारकुलातील व्यक्तींची माहिती शोधता येण्यासाठी शोध व्यवस्था उपलब्ध करून देणे शक्य आहे. आपण या उपक्रमात सहभागी व्हा तसेच आपल्या परिचयातील सर्व कुलबंधूंना याबाबत सूचित करा.
आपले सहकार्य आम्हाला मोलाचे आहे.
आपले विश्वासू,
दातार कुलमंडळ कार्यकारणी
The software will collect and manage information of all DATARS
Please read and understand the registration process.
• Females born in DATAR KUL
• Females born in Datar KUL but married outside (MAHERWASHINS)
• Females who are married to Datars